*बळीराजा शेतकरी संघटना नूतन पदाधिकारी निवडी जाहीर!*

पंढरपूर /प्रतिनिधी
केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर रेस्ट हाऊसला बळीराजा शेतकरी संघटनेच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी डॉक्टर उन्मेश देशमुख, सोलापूर संपर्कप्रमुख राजेंद्र सावळे, जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास खराडे व सर्जेराव शेळके,जिल्हाकार्यध्यक्ष डॉ.दिंगाबर मोरे, जिल्हा संघटकपदी तानाजी सोनवले, माळशिरस तालुका अध्यक्ष तानाजी जाधव, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी रमेश लंगोटे, संपर्क प्रमुखपदी रणजित शिंदे अशा विविध निवडी पंढरपूर मध्ये संपन्न झालेल्या या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केद्रीयध्यक्ष पंजाबराव पाटील,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर ,सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, विश्वास जाधव जिल्हाउपाध्यक्ष रमेश भोसले, रामेश्वर झांबरे, औदुंबर सुतार, दामाजी मोरे,विठ्ठल ढेकळे, दत्तात्रेय वरपे, जयवंत गायकवाड, धनंजय भोसले, मारुती बोरकडे सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते...